इंडियन कंपोझिट्स मेक इन इंडियाशी संलग्न

 Pali Hill
इंडियन कंपोझिट्स मेक इन इंडियाशी संलग्न

मरिन ड्राइव्ह - इंडियन कंपोझिट्स उद्योगानं सोमवारी सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाबरोबर संलग्नता जाहीर केली आहे. 10 ते 12 जानेवारीला गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला रिएन्फोर्स्ड प्लास्टिकबाबत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर कंपोझिट्स इंडस्ट्रीजच्या महत्त्वाच्या सदस्यांनी आपल्या मागण्याही मांडल्या.

या सोहळ्याचं उद्घाटन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे. भारतातल्या कंपोझिट्स उद्योगाची क्षमता पूर्णपणे वापरण्यात आलेली नाही आणि भविष्यात कंपोझिट्स उत्पादनांत मोठ्या प्रमाणात वाढीची संधी आहे. मेक इन इंडियासाठी ही चांगली संधी आहे. कंपोझिट्स उद्योग सध्या 6 टक्के दरानं प्रगती करतो आहे. या संधीचा फायदा मिळण्यासाठी सरकारला सवलतींच्या मार्गानं संपूर्ण पाठिंबा द्यावा आणि हस्तक्षेप करावा, अशी विनंती करत असल्याचं एफआरपीचे अध्यक्ष प्रा. एस. सी. लक्कड यांनी सांगितलं.

Loading Comments 

Related News from व्यवसाय