अबब..! चंदा कोचर यांना दिवसाला 2.1 लाख पगार

Mumbai
अबब..! चंदा कोचर यांना दिवसाला 2.1 लाख पगार
अबब..! चंदा कोचर यांना दिवसाला 2.1 लाख पगार
See all
मुंबई  -  

या वर्षी आपल्याला वैयक्तिक कामगिरीच्या आधारे 10 टक्के नाहीतर किमान 5 टक्के पगारवाढ तर नक्कीच मिळेल, अशी भाबडी आशा बाळगणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे डोळे आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना मिळालेली पगारवाढ वाचून पांढरे होतील. उत्तम कार्यकौशल्याद्वारे आयसीआयसीआय बँकेला नफा मिळवून देणाऱ्या कोचर यांना बँकेनेही 64 टक्क्यांच्या पगारवाढीचा घसघशीत परतावा दिला आहे. यामुळे त्यांचा एका दिवसाचा पगार तब्बल 2 लाख 10 हजार रुपयांवर गेला आहे. बँकेच्या सन 2017 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदामध्ये कोचर यांच्या मानधनात 2 कोटी 20 लाख रुपयांची वाढ 'कामगिरी बोनस' अंतर्गत करण्यात आली आहे.

या बोनसमुळे चंदा कोचर यांच्या पगारात 64 टक्क्यांची वाढ झाली असून त्यांचा वार्षिक पगार 7 कोटी 85 लाख इतका झाला आहे. याचाच अर्थ त्यांचा महिन्याचा पगार 65 लाखांच्या घरात गेला आहे. या हिशोबाने त्यांचा एक दिवसाचा पगार 2 लाख 10 हजार रूपये होतो. चंदा कोचर यांच्या मूळ पगाराव्यतिरिक्त 13 लाख 75 हजार रूपयांचे इतर भत्ते त्यांना देण्यात येणार असून त्यासाठी रिझर्व बँकेकडे परवानगी मागण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारचे भत्ते, फायदे, प्रॉव्हिडंट, ग्रॅज्युईटी फंड आणि निवृत्तीवेतनाचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सर्वाधिक पगार घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी -

सन 2016 मध्ये कोचर या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होत्या. गेल्या वर्षी एचडीएफसी बँकेचे अदित्य पुरी आणि अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा कोचर यांच्या पुढे होते. गेल्या वर्षी पुरी यांना 9 कोटी 70 लाख, तर शर्मा यांना 5 कोटी 50 लाख रूपये पगार होता. त्या तुलनेत चंदा कोचर यांना खूप कमी म्हणजे 4 कोटी 79 लाख रूपये पगार होता.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.