Advertisement

१ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचे सिमकार्ड होणार बंद, ग्राहकांनो नंबर पोर्ट करा

३१ ऑक्टोबरपर्यंत या मोबाईल कंपनीच्या ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करणं आवश्यक आहे. नाहीतर त्यांचा नंबर बंद होऊ शकतो.

१ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचे सिमकार्ड होणार बंद, ग्राहकांनो नंबर पोर्ट करा
SHARES

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरीटी ऑफ इंडिया (TRAI)च्या नव्या नियमानुसार एअरसेल या टेलिकॉम कंपनीची सेवा १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. एअरसेलची सेवा वापरणारे जवळपास ७ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत या ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करणं आवश्यक आहे. नाहीतर त्यांचा मोबाईल नंबर बंद होऊ शकतो. ४ ते ११ नोव्हेंबर या दिवसांमध्ये पोर्ट करण्याची सुविधा बंद असल्यामुळे ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याची माहिती ट्रायनं दिली आहे.


...नाहीतर नंबर बंद होईल

२०१८ सालच्या सुरुवातीला एअरसेल कंपनीनं ग्राहकांना सुविधा देणं बंद केलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ट्रायकडे युनिक पोर्टींग कोड देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. ज्याद्वारे ग्राहकांना आपला नंबर पोर्ट न करता इतर कोणत्याही एका कंपनीच्या सेवेचा लाभ घेता येईल आणि त्यांची सेवा सुरू राहील. मात्र ट्रायच्या अहवालानुसार, एअरसेल कंपनीचे  ७० कोटी ग्राहक आहेत. त्यांनी जर दिलेल्या तारखेपर्यंत त्यांचा नंबर पोर्ट केला नाही तर त्यांचं सिमकार्ड बंद होऊ शकतं. त्यानंतर तो नंबर पुन्हा तुम्हाला अॅक्टीवेट करता येणार नाही.


किती ग्रहकांनी केला पोर्ट?

२०१८ साली एअरसेलचे साधारण ९ कोटी युजर्स होते. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी एअरसेलनं ट्रायसमोर प्रस्ताव ठेऊन यूपीसी कोड देण्याची विनंती केली. २८ फेब्रुवारी रोजी ट्रायनं एअरसेलला पहिला एडिशनल कोड दिला. त्या कोडनंतर २८ फेब्रुवारी ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत जवळपास १९ लाख ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट केला. ट्रायच्या आदेशानुसार आता उर्वरित ग्राहकांना आपला नंबर ३१ ऑक्टोबरपर्यंत तातडीने पोर्ट करणं आवश्यक आहे. अन्यथा एअरसेलचं सिमकार्ड बंद करण्यात येईल.


'असा' करा यूपीसी कोड जनरेट

) एअरसेल ग्राहकांना मॅन्युअली यूपीसी कोड जनरेट करावा लागेल. ग्राहकांना मॅन्यूअली नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे.

) मेसेज ऑपशन निवडा तिथे PORT टाइप करा आणि 1900 या नंबरवर मेसेज पाठवून द्या

) फोनमध्ये बॅलन्स नसेल तर हा मेसेज जाणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आपल्या फोनला बॅलन्स असायला हवा. किमान रुपये तरी.

) काही मिनिटांत तुमच्या नंबरवर युनिक पोर्टींग कोड म्हणजेच UPC चा एक मेसेज येईल. तुम्हाला ज्या कंपनीमध्ये पोर्ट करण्याची इच्छा आहे तिथल्या सर्विस प्रोवायडरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या नंबर पोर्ट करू शकता.

) नंबर पोर्ट होण्यासाठी साधारण ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागतो.



हेही वाचा

BSNL आणि MTNL चं होणार विलीनीकरण

अवघ्या मिनिटांत इन्फोसिसचे ४५ हजार कोटी बुडाले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा