Advertisement

अवघ्या मिनिटांत इन्फोसिसचे ४५ हजार कोटी बुडाले

इन्फोसिसमधील काही कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस आपल्या उत्पन्नाचे आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. मंगळवारी शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर्स कोसळण्यास सुरूवात झाली.

अवघ्या मिनिटांत इन्फोसिसचे ४५ हजार कोटी बुडाले
SHARES

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसला मंगळवारी शेअर बाजारात मोठा फटका बसला. इन्फोसिसचा शेअर्स १६ टक्क्यांनी घसरल्याने गुंतवणुकदारांना तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मागील ६ वर्षात प्रथमच इन्फोसिसचा शेअर्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळला. 

इन्फोसिसमधील काही कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस आपल्या उत्पन्नाचे आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. मंगळवारी शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर्स कोसळण्यास सुरूवात झाली. बाजार बंद होईपर्यंत इन्फोसिसचा शेअर्स १६.२१ टक्क्यांनी कोसळला. शेअर्सचा भाव १२४ रुपयांनी घटून ६४३.३० रुपयांवर आला. शुक्रवारी इन्फोसिसच्या शेअर्सचा भाव  ७६७.७५ रुपये होता. मोठ्या प्रमाणावर शेअर्स कोसळल्याने गुंतवणुकदारांचे ४५ हजार कोटी रुपये बुडाले. 

इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का आणि संस्थापक नारायणमूर्ती यांच्यातील वादाचा फटका याआधी इन्फोसिसला बसला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे कंपनीला आणखी फटका बसणार आहे. या आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचं इन्फोसिसने सांगितलं आहे. 



हेही वाचा  -

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा