• अचानक बिघडलेल्या कॉम्प्युटरमुळे ग्राहक त्रस्त
SHARE

वडाळा - वडाळा पश्चिम परिसरातील डेव्हिड एस बॅरेटोजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॉम्प्युटर बंद पडल्यामुळे ग्राहक त्रस्त झालेत. अचानक बंद पडलेल्या या कॉम्प्युटरमुळे बँकेचं कामकाज काही काळासाठी ठप्प झालं. रविवार असल्यामुळे बँकेच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र अचानक कॉम्प्युटर बंद पडल्यामुळे ग्राहक वैतागले. आधी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना एकच रांग लावायला सांगितली. मात्र अचानक कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन वेगवगळ्या रांगा लावण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे रांगांचा घोळही निर्माण झाला. दरम्यान संतापलेल्या ग्राहकांनी बँकेतील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या