Advertisement

जेट एअरवेज २५ विमानांसह पुन्हा घेणार भरारी

दिवाळखोरीत गेल्याने बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेज पुन्हा भरारी घेणार आहे. जेट एअरवेज चार ते सहा महिन्यात सुरु होणार आहे.

जेट एअरवेज २५ विमानांसह पुन्हा घेणार भरारी
SHARES

दिवाळखोरीत गेल्याने बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेज पुन्हा भरारी घेणार आहे. जेट एअरवेज चार ते सहा महिन्यात सुरु होणार आहे. नोव्हेंबरमध्ये जेट एअरवेजसाठी पुनरुज्जीवन योजना दाखल केल्यानंतर मालमत्ता व्यवस्थापन कंपनी कलरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारीलाल जालान यांनी तयार केलेल्या कन्सोर्टियमने म्हटलं आहे की, जेट एअरवेज पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) कडून हिरवा कंदिल मिळवणं आवश्यक आहे. एनसीएलटीकडून मंजुरी मिळाली की जेट एअरवेजची विमानं पुन्हा हवेत झेपावणार आहेत. 

मुरारीलाल जालान म्हणाले की,  भारतीय हवाई क्षेत्राबद्दल आम्ही सकारात्मक आहोत कारण हे क्षेत्र कोरोना विषाणूच्या संकटानंतर पुन्हा सावरत आहे. जेट एअरवेज प्रारंभी २५ विमानांसह हवाई उड्डाणाला सुरुवात करणार आहे.एनसीएलटीचा निर्णय लवकरच होईल, अशी आम्हाला आशा आहे.

'जेट २.०' या नव्या नावासह जेट एअरवेज सुरू होणार आहे. कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहाने कृती आराखडा तयार केला आहे. या समूहाचे नेतृत्व कालरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारी लाल जालान यांच्याकडून करण्यात येत आहे. 

तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या तोट्यामुळे जेट एअरवेजचं कामकाज मागील वर्षी एप्रिल महिन्यात ठप्प झालं. यामुळे कंपनीतील १६ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. जेट २.० चे मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये हवाई सेवेचा विस्तार केला जाणार आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा