Advertisement

पैशासाठी पायपीट


पैशासाठी पायपीट
SHARES

मुंबई - मागील दोन दिवसापासून 500 आणि एक हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानं अनेकांना सुट्ट्या पैशांअभावी चणचण भासू लागली. पण गुरुवार उजाडल्यानंतर सकाळपासूनच बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या बाहेर लांबचलांब रांग लागली होती. काहींना तर उन्हातच उभं राहावं लागलं होतं. तर मुंबईतल्या पूर्व उपनगरात ग्राहकांची तारांबळ उडाली होती. तर मुलुंडमध्ये एका कुटुंबाला गुरुवारी विदेशात जायचं होतं. पण पाचशे हजारांच्या नोटांसाठी बँकेत चार तास रांगेत उभं राहावं लागलं. तर भांडुपच्या काही बँकांत फक्त शंभरच्या नोटाच दिल्या जात होत्या. दुपारच्या दरम्यान बँकांमधील नवीन नोटा संपल्यानं घाटकोपरमधील आर्य अंकुश यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली. याचा परिणाम छोटे व्यावसायिक, भाजीविक्रेते आणि रिक्षाचालकांवरही झाला.
तर चेंबूर, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी येथेही दिवसभर बँकांसंमोर रांगच रांग लागली होती. रात्री आठ वाजेपर्यंत या रांगा कायम होत्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बँकेसमोर पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. एकूणच पंतप्रधान मोदींच्या अचानक हजार पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांची पायपीट झाली. अशीच परिस्थिती अजूनही दोन दिवस कायम असणार यात शंका नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा