Advertisement

MYSUN ने गुंतवणूकदारांकडून उभारले 32 कोटी, आणखी 250 कोटी रुपये उभारण्याची योजना


MYSUN ने गुंतवणूकदारांकडून उभारले 32 कोटी,  आणखी 250 कोटी रुपये उभारण्याची योजना
SHARES

मायसन (MYSUN) या उद्योग, एसएमई,एमएसएमई आणि घरे यांना रूफटॉप सौर उर्जेची सेवा पुरवणाऱ्या दिल्लीस्थित कंपनीने विद्यमान गुंतवणूकदारांकडून 32 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. कंपनी नवीन बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने योजना आखत आहे आणि अगदी छोट्या ते मध्यम मुदतीच्या काळात नवीन व्यवसायांचा शोध घेणार आहे. हे साध्य करण्यासाठी कंपनी त्यांचे तंत्रज्ञान, ग्राहक संपादन आणि वित्तपुरवठा वाढविण्यावर भर देत आहे.. यासाठी मायसन पुढील काही तिमाहीत 250 कोटी रुपये उभारण्याचा विचार करीत आहे.


मायसन  ही भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रूफटॉप सौर कंपनी आहे. कंपनी निवासी, लहान औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थांसाठी सौर तंत्रज्ञान देणारी कंपनी आहे. कंपनी भांडवलाचा वापर आपल्या तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, सेवेचा विस्तार करण्यासाठी करणार आहे. याशिवाय मध्य पूर्व, एशिया पॅसिफिक आणि आफ्रिका या देशांसह भारत आणि जागतिक स्तरावर नवीन भौगोलिक क्षेत्रापर्यंत विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.

याबद्दल बोलताना मायसनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गगन वर्मानी म्हणाले, ग्राहकांना सौर ऊर्जेची सेवा सोपी आणि विश्वासार्ह देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 
तंत्रज्ञानाचा आमच्या व्यवसायाच्या कणा म्हणून वापर करणे आणि एसएमई आणि घरगुती सारख्या ग्राहकांना सेवा देणं याकडे आमचे लक्ष आहे. आमच्या गुंतवणूकदारांचा आणि आमच्या वाढत्या ग्राहकांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात आम्हाला आनंद आहे.

अलिकडच्या जागतिक घडामोडींमुळे उर्जा क्षेत्र तसेच एकूणच आर्थिक 
क्षेत्र वेगाने बदलत आहे, आम्हाला पुढील अनेक वर्षांत जगभरातील बी 2 बी आणि बी 2 सी ग्राहकांमध्ये स्वतंत्र सौर उर्जा यंत्रणेची जास्त मागणी दिसते. आमचे अद्ययावत तंत्रज्ञान, व्यवसाय मॉडेल आणि अत्यंत अनुभवी टीमद्वारे या मागणीचा फायदा घेण्यासाठी मायसन कायमस्वरूपी या  व्यवसायात आहे, असं वर्मानी म्हणाले.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा