SHARE

मुंबई - नोटबंदीनं त्रस्त नागरिकांना पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याची बातमी थोडा दिलासा देऊ शकेल... आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती उतरल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 46 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटर 1 रुपया 53 पैसे कपात करण्याची घोषणा तेल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोल दरकपातीमुळे वाहनधारकांना तर डिझेल दरकपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयानंतर मुंबईत पेट्रोल 72 रुपये 29 पैसे आणि डिझेल 60 रुपये 32 पैसे प्रतिलिटरनं मिळेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या