Advertisement

पेट्रोल, डिझेल ६ रुपयांनी स्वस्त होणार?

कच्च्या तेलाच्या (crude oil) उत्पादनात घट करण्यावरून सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि रशिया (Russia) या दोन देशांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यामुळे किंमत युद्ध पेटलं आहे.

पेट्रोल, डिझेल ६ रुपयांनी स्वस्त होणार?
SHARES

कच्च्या तेलाच्या (crude oil) उत्पादनात घट करण्यावरून सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि रशिया (Russia) या दोन देशांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यामुळे किंमत युद्ध पेटलं आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेेठेत कच्च्या तेलाचे दर तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने भारतात पेट्रोल ( petrol) आणि डिझेल (diesel) प्रती लिटर ६ रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं आहेेत. 

करोना व्हायरस (Corona virus) चाही फटका कच्चा तेलाच्या बाजारपेठेला बसला आहे. कच्च्या तेलाची (crude oil) निर्यात करणाऱ्या देशांच्या ओपेक संघटनेची उत्पादनाच्या घटाबाबत एक बैठक नुकतीच पार पडली. कोरोना व्हायरसमुळे इंधनाची मागणी कमी होईल. त्यामुळे उत्पादन कमी करावं, अशी ओपेकच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, रशियाने याबाबत सहमती दर्शवली नाही. कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याबाबत सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यामध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेेठेत कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. सौदी अरेबिया आणि रशिया हे कच्च्या तेलाची निर्यात करणारे सर्वात मोठे देश आहेत. 

सौदी अरेबिया आणि रशियामध्ये किंमत युद्ध सुरू झालं आहे. सोमवारी कच्च्या तेलाचे भाव १९९१ नंतर प्रथमच सर्वात खालच्या पातळीवर गेले आहेत.  जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची दरात १४.२५ डॉलरने घट झाली आहे. कच्च्या तेलाचे दर आता ३१.०२ डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत.

ओपेक ही इंधन निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. या संघटनेत १५ देश आहेत. या संघटनेकडून तेलांच्या किंमतीत मोठी कमाई केली जाते. सौदी अरेबिया या देशांचा प्रमुख मानला जातो. जगातली ४४ टक्के तेल निर्मिती ओपेक देशांकडून केली जाते. तर  जगातील८१.५ टक्के तेल साठा या देशांकडे आहे.



हेही वाचा -

वर्षभरात 'या' बँकांमध्ये १ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे घोटाळे, वाचाल तर चक्रावून जाल...




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा