SHARE

हजारो कोटी रुपयांचा आर्थिक बोजा असणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (आर इन्फ्रा)ने मुंबईतील इलेक्ट्रीसिटी बिझनेस अदानी समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १८ हजार ८०० कोटी रुपयांचा हस्तांतर करार या दोन्ही कंपन्यांमध्ये करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा वापर आर. इन्फ्रा कर्ज कमी करण्यासाठी करणार असून ३ हजार कोटी रुपयांची शिल्लक रक्कमही आर. इन्फ्राच्या हाती उरेल, असं म्हटलं जात आहे.


किती हिस्सा विकणार?

रिलायन्स इन्फ्रा एकूण व्यवसायातील १० टक्के हिस्सा अदानी समूहाच्या अदानी ट्रान्समीशन कंपनीला विकणार आहे. त्यासंदर्भात करार नुकताच करण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार या कराराअंतर्गत वीज उत्पादन, विद्युत प्रेषण आणि वीज वितरण व्यवसायाचा समावेश आहे.


किती रुपयांचा करार?

हा करार एकूण १३ हजार २५१ कोटी रुपयांचा असून त्यामध्ये १२ हजार १०१ कोटी रुपयांचं व्यवसायमूल्य आणि १ हजार १५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. सोबतच या करारानुसार ५ हजार कोटी रुपयांचे अंडर अप्रुव्हल अॅसेट आणि आर. इन्फ्राला थेट मिळणाऱ्या ५०० कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यानुसार हा करार एकूण १८ हजार ८०० कोटी रुपयांचा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या