Advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले


SHARES

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदी आणि इतर मुद्दांवर आपली भूमिका मांडलीय. शिवसेनेबद्दल अनेक वेळा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. गुजराती समाजानं शिवसेनेसोबत आले पाहिजे असे बाळासाहेबांना नेहमी वाटायचे. मुंबईमध्ये कोणत्याही समाजावर संकट आले असेल शिवसैनिक अगोदर धावून येतो. शिवसेनेमध्ये सामील झालेल्या गुजराती लोकांचा सन्मान पक्षात केला जाईल. आजपर्यंत गुजराती समाजाचा दुरूपयोग केला गेला शिवसेनेत असं होणार नाही असं ते म्हणालेत. दुर्देवाने गेल्या काही दिवसांपासून देशात काय चाललंय कुणाला कळलंय की नाही मला माहिती नाही. पण शिवसेनेत मी तुम्हाला रांगेत उभं करणार नाही. सध्या रांगेत उभं राहणं हा राष्ट्रीय कार्यक्रम बनलाय असं सांगत त्य़ांनी भाजपावर टीका केलीय. जिल्हा बँकांमध्ये शेतकऱ्यांचे, गरीबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लावून काय मिळवले असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. विजय मल्ल्यानं काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते का? आता अॅक्सिस बँकेचा घोटाळा समोर येतोय. त्या बँकेला तर क्लिनचिट पण देऊन टाकलीय. सरकारने जाहीर करावे की आता शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकांवर निर्बंध लावून ते पुढे शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणार आहेत का? भ्रष्टचारी असतील त्यांना शिक्षा करा आता सर्व बँकेमध्ये नोटाबंदीनंतर अधिकृत पैसे वाटप झाले आहे ते खासगी बँकेतून झाले आहे ते जिल्हा सहकारी बँकेमधून झाले नाही.
भ्रष्टाचाराचं मी कधीही समर्थन केले नाही. मी अर्थतज्ञ्ज्ञ नाही मात्र निर्णय योग्य असला तरी योग्य रीतीने राबविले गेले नाही, असे तज्ञ्ज्ञ म्हणताहेत. राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही पण जनता समजूतदार आहे. जनता पाहत आहे कोण काय बोलतंय ते असं सांगत त्यांनी मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा