Advertisement

आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये कसे कराल पैशांचे नियोजन?


आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये कसे कराल पैशांचे नियोजन?
SHARES

वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक व कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होत असून, कधीकाळी सर्वांचाच आधार असलेली ही मंडळी आता स्वतःला आधार मिळण्य़ाची अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळे कमावलेल्या जमापुंजीचे योग्य नियोजन कसे करावे? अर्थसंकल्पातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या सवलती मिळाल्या? याबाबत नुकतेच शिवाजीपार्क येथे चार्टड अकाऊंटंट भूषण लिमये यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.



अर्थसंकल्पात ज्येष्ठांसाठी सवलती

देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रतिष्ठेने जगता यावे, यासाठी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक सवलती जाहीर केल्या. प्राप्तिकराचे कमी केलेले दर व हाती असलेल्या पुंजीवर दीर्घकाळ निश्चित दराने व्याज मिळून ज्येष्ठांच्या हाती चार पैसे अधिक राहतील, असे त्यांचे स्वरूप होते.

आपल्याला असलेल्या सवलतींची माहिती फार कमी ज्येष्ठ नागरिकांना असते. यातील किचकट प्रक्रियेमुळे काही गोष्टी ज्येष्ठ नागरिकांच्या फारशा पचनी पडत नाही. त्यामुळे स्वतःजवळील जमापूंजी एकत्र बँकेत ठेवून लागेल त्या प्रमाणे खर्च करतात. मात्र, गरजेच्या वेळी त्यांचे हात मोकळे झाल्याची अनेक उदाहरणे आपणी ऐकली आहेत. म्हणून हे शिबिर आयोजित केले.

भूषण लिमये, चार्टर्ड अकाऊंटंट



ज्येष्ठ नागरिकांनो, काय कराल तुमच्या पैशांचं?

त्यामुळे ‘सेंकड इनिंग’मध्ये पैशांचे योग्य नियोजन कसे करावे? तसेच नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सवलती देण्यात आल्या आहेत? याबाबत शिवाजीपार्क येथील नाना नानी पार्कमध्ये चार्टर्ड अकाऊंटंट भूषण लिमये यांचे मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजनाबाबत अनेक शंका दूर करत, लिमये यांनी भविष्यातील त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीबाबत त्यांना मोफत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना कधीही आर्थिक गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी रुम नं 3, तिसरा मजला, अथर्व बिल्डिंग, शिवाजी पार्क येथील कार्यालयात येऊन किंवा 9833123902 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा