SHARE

देशातील बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून लंडनमध्ये पळालेले उद्योगपती विजय माल्या यांनी अाता बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली अाहे. बँकांशी तडजोड करण्याची तयारी असल्याचे सांगत माल्या यांनी न्यायालयाकडे अापली संपत्ती विकण्याची परवानगी मागितली अाहे.  विजय माल्या यांनी बऱ्याच कालावधीनंतर मौन तोडलं अाहे. माल्या यांनी पाच पानांच्या पत्रातून अापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला अाहे.  
  


फसवणूकीचा पोस्टर बाॅय बनवलं

या पत्रात माल्या यांनी म्हटले की, बँकांचे कर्ज फेडण्यासाठी मी अनेक प्रकारे प्रयत्न केले. १५ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अाणि अरूण जेटली यांना मी पत्रही लिहिलं होतं. मात्र, दोघांकडून मला कसलंही उत्तर मिळालं नाही. मला फसवणूकीचा पोस्टर बाॅय बनवण्यात अालं. माल्या यांनी २२ जून रोजी कर्नाटक न्यायालयात धाव घेतली अाहे. अापल्याकडे असलेली संपत्ती अाणि ईडीने जप्त केलेली संपत्ती विकण्यास अापल्याला परवानगी द्यावी. या संपत्तीच्या विक्रीतून बँकांचे कर्ज फेडता येईल, असं माल्या यांनी पत्रात म्हटलं अाहे. 


नेते अाणि मीडियाने अारोप लावले

माल्या म्हणाले की, माझ्यावर राजकीय नेते अाणि मीडियाने असे अारोप लावले की जणू काय मी ९ हजार कोटी रुपये चोरून पळून गेलो अाहे. मात्र, हे कर्ज  किंगफिशर एअरलाइन्सला दिलं होतं. कर्ज देणाऱ्या काही बँकांनी माझ्यावर विलफुल डिफॉल्टरचाही शिक्का मारला. त्यामुळे मी जनतेच्या रागाचे कारण बनलो. अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) पैसे अफरातफरी कायद्यानुसार माझी अाणि माझ्या कुटुंबाची संपत्ती जप्त केली. या संपत्तीची किमत जवळपास १३ हजार ९०० कोटी रुपये अाहे. तर बँकांचे माझ्यावर ९ हजार कोटींचे कर्ज अाहे.

भारतात परतण्यास नकार

३१ जानेवारी २०१४ पर्यंत किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांचे ६९६३ कोटी रुपयांचे कर्ज होते. या कर्जावर व्याज अाकारल्यानंतर माल्या यांच्या कर्जाचा अाकडा ९ हजार कोटी रुपयांवर गेला. माल्या २०१६ मध्ये भारतातून पळून गेले. यावेळी त्यांनी मी माझ्या मुलांना भेटण्यासाठी जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी भारतात परतण्यास नकार दिला. भारत सरकारने जारी केलेल्या वाॅरंटवर कारवाई करत माल्या यांना गेल्या वर्षी १८ एप्रिलला लंडनमध्ये अटक करण्यात अाली. यावेळी त्यांनी तात्काळ जामीनही मिळाला होता. हेही वाचा - 

दिल्लीतील एनबीसीसी वडाळ्यात बांधणार १९८० लक्झरिअस घरं

बिल्डर, ग्राहकांमधील वादावर 'महारेरा'च एकमेव पर्याय!संबंधित विषय
ताज्या बातम्या