Advertisement

बेस्ट बसचा ताफा कमी होणार, 'बेस्ट बचाओ' अभियान सुरू

नवीन खरेदी न केल्यास 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात बसेस संपुष्टात येतील. याचा परिणाम सध्याच्या चालकांच्या कामावर होणार आहे.

बेस्ट बसचा ताफा कमी होणार, 'बेस्ट बचाओ' अभियान सुरू
SHARES

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) बसचा ताफा 2024 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. 1,094 वरून हा आकडा कमी होऊन 761 पर्यंत येऊ शकतो. 2025 च्या अखेरीस हा आकडा 251 बसेसवर येऊ शकतो. परिवहन मंडळाने युनियनसोबत 2019 च्या करारामध्ये देखरेख ठेवण्यासाठी मान्य केलेल्या 3,337 बसपैकी हे फक्त 8% असेल.

सोमवारी, 15 जुलै रोजी बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी या विषयावर माध्यमांशी बोलताना ही आकडेवारी शेअर केली. बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या वाढवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’ (BEST Bachao) मोहिमेची घोषणाही त्यांनी केली.

नवीन खरेदी न केल्यास 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील बस संपुष्टात येतील, असा इशारा राव यांनी दिला. याचा परिणाम सध्याच्या चालकांच्या कामावर होणार आहे. या मोहिमेला बस प्रवाशांचे समर्थन करणाऱ्या संस्था आणि स्वयंसेवी संस्थांकडून पाठिंबा मागितला जात आहे. या मोहीमेतून (campaign) समर्थन मिळवण्यासाठी तीन सार्वजनिक मेळावे घेतले जातील. या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जाईल. जनजागृती मोहीम, रॅली आणि स्वाक्षरी मोहिमेचेही नियोजन होणार आहे.

व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांवर राव यांनी भर दिला. गेल्या पाच वर्षांत, फ्लीटमध्ये 67% घट झाली आहे. अलीकडच्या काळात बेस्टने एकही नवीन बस खरेदी केलेली नाही. त्याऐवजी ओला भाडेतत्त्वावर नवीन बस खरेदी करण्याचा करार केला आहे.

अहवालानुसार, बेस्टची स्वतःची बस खरेदी करण्याची योजना आहे. तसेच त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) 2,237 बस खरेदी करण्यासाठी 3,419 कोटी निधीची विनंती प्रस्तावित केली आहे.

तसेच हे अधोरेखित केले गेले आहे की, कुशल चालक आणि नियमित देखभाल यामुळे स्व-मालकीचा बस ताफा फायद्याचा आहे. याउलट कंत्राटी बसचे चालक कमी अनुभवी आहेत. तसेच अलीकडे या नवख्या वाहनचालकांचे अनेक अपघातही झाले आहेत.



हेही वाचा

पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात

अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्बची धमकी देणाऱ्याला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा