SHARE

वडाळ्यात आयमॅक्स परिसरात ऑईलने भरलेला टँकर उलटल्याने भीषण आग लागली. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर टँकरचे टायर फुटल्याने भररस्त्यात सर्वत्र आगीचे लोळ पसरले. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान या भीषण आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला.


टायर फुटल्याने भीषण आग

सोमवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी वडाळ्यातल्या भक्ती पार्क परिसरात असलेल्या आयमॅक्स सिनेमाजवळ रस्त्याततच हा टँकर उलटला. याचदरम्यान टँकरचे टायर फुटल्याने टँकरने पेट घेतला. टँकरमध्ये तेल असल्याने या आगीचा प्रचंड भडका उडाला. यामध्ये टँकर चालक प्रताप मोरे याचा मृत्यू झाला आहे.


'या' मार्गावर वाहतूक कोंडी

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. या आगीमुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या