Advertisement

चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या सुविधा आता हळुहळू सुरू केल्या जात आहेत.

चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या सुविधा आता हळुहळू सुरू केल्या जात आहेत. मुंबईसह देशभरातील उद्योगधंदे, व्यवसाय, शिएटर्स, यांसारख्या अनेक सुविधा टप्प्याटप्प्यात सुरू झाल्या. अशातच आता देशभरातील चित्रपट, नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून १०० टक्के प्रेक्षकांना थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट पाहता येणार आहे.

मध्यंतरीच्या काळात चित्रपट, नाट्यगृहांचं उत्पन्न खालावलं होतं ते वाढण्यास या निर्णयामुळे आता मोठी मदत होणार आहे. कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारनं नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. त्यानुसार, चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.

चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंग राखावं तसंच तोंडावर मास्क लावावे, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीमुळं केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू केल्यानंतर देशभरातील हजारो चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद झाली. त्यामुळं चित्रपटांचा व नाटकांचाही व्यवसाय खूपच मंदावला होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली. मात्र, सभागृह क्षमतेच्या फक्त ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली होती.

चित्रपट व नाट्यगृहे पूर्वीसारखी चालावीत म्हणून त्यांच्या संचालकांनीही चित्रपट, नाटकाचे खेळ कमी केले आहेत. प्रेक्षकांना सर्व नियम पाळण्यास सांगितले जाते व तिकीट बुकिंग ऑनलाइन पद्धतीनं करण्यावर भर देण्यात आला. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा