Advertisement

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी १०५ नवे कोरोना रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत COVID 19 चे ५ हजार ८५१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी १०५ नवे कोरोना रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू
SHARES

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी COVID 19 चे नवे रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार मंगळवारी कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत COVID 19 चे ५ हजार ८५१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मीरा-भाईंदर इथं मंगळवारी १०५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजार ८५१च्या घरात गेला. त्याचबरोबर यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १०७ वर गेला आहे. मंगळवारी, या आजारातून १४६ रुग्ण बरे झाले. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही ४ हजार ४२४ इतकी आहे.


हेही वाचा : कोरोना व्हायरसवरील 'या' औषधाच्या किंमतीत घट, कंपनीनं रुग्णांसाठी घेतला निर्णय


६ जून रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेने मीरा-भाईंदरमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत अनावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. १ जुलै ते १० जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले. त्यास आता आणखी वाढवण्यात आलं आहे. मीरा-भाईंदर इथं आता पूर्ण लॉकडाउन १८ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर पालिकेच्या काही मार्गदर्शक सुचना

  • सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक
  • सार्वजनिक ठिकाणी ६ फुट अंतर ठेवणं बंधनकारक आहे
  • सार्वजनिक कार्यक्रमात ५० लोक सहभागी होऊ शकतात. पण परवानगी घेणं बंदकारक
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान करणं आणि मद्यपान करण्यास मनाई
  • घरातून काम करणं शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम करणं
  • कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणं बंधनकारक

हेही वाचा

पनवेलमध्ये मंगळवारी १७५ कोरोना रुग्णांची नोंद

मिरा-भाईंदरमध्ये घराघरात जाऊन होणार वैद्यकीय तपासणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा