Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मिरा-भाईंदरमध्ये घराघरात जाऊन होणार वैद्यकीय तपासणी

रुग्णांची वाढती संख्या पाहता मीरा भाईंदर महानगर प्रशासनानं आता वैद्यकीय तपासणीसाठी घरोघरी जाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये घराघरात जाऊन होणार वैद्यकीय तपासणी
SHARES

मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदरमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता मीरा भाईंदर महानगर प्रशासनानं आता वैद्यकीय तपासणीसाठी घरोघरी जाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय तपासणीत काहीही संशयास्पद आढळल्यास पुढील तपासणीनंतर त्यांच्यावर उपचार केले जातील.

गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये कोरोनाव्हायरस बाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. प्रशासनानं परिसरातील रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु तरीही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे.

मीरा-भाईंदर शहरात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर MBMC म्हणजेच मीरा भाईंदर महानगरपालिकेनं निर्णय घेतला आहे की, आता सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रूग्णांना घरी क्वारंटाईन केलं जाणार नाही.

एमबीएमसी कडून बर्‍याच तक्रारी येत होत्या की, घरी क्वारंटाईन केलेल्या रुग्ण बिनधास्त भटकत असतात. यामुळे इतरांचे जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून एमबीएमसीनं अशा रुग्णांना घरी क्वारंटाईन करण्याऐवजी कोरोना सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.हेही वाचा

पश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष

दहिसरमध्ये पार पडलं SERO सर्वेक्षण

कोरोनाव्हायरसवरील 'या' औषधाच्या किंमतीत घट, कंपनीनं रुग्णांसाठी घेतला निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा