Advertisement

पश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष

अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असलेल्या इमारतींवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

पश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. आता तर पश्चिम उपनगरातील बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि मालाडमधील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असलेल्या इमारतींवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

काकणी यांनी गेल्या चार आठवड्यात पश्चिम उपनगरास भेट दिली आहे. महानगरपालिका कर्मचारी विविध इमारती आणि सोसायटीच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याचे मार्ग सोसायटीच्या सदस्यांना समजावून सांगत आहेत. वेगेवगळ्या ठिकाणी ताप मोजण्यासाठी क्लिनिक स्थापित केले जात आहेत.

यासह स्थानिक लोकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासणंही एक मोठं काम आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काय करावे? आणि काय करू नये? याबद्दलही सोसायटीला निर्देश देण्यात येतील. इतकेच नव्हे तर गृहिणी, घरी काम करणार्‍या महिला आणि वाहनचालकांबाबतही खबरदारी घ्यावी असं सांगण्यात येत आहे.

वाहनांमध्ये प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये पॉलिथीन पडदे असावेत, अशी सूचना करण्यात येत आहे. ही वाहनं वापरण्यासाठी, एखाद्यानं आपले हात धुवावे आणि वाहनाचे हँडल निर्जंतुकीकरण करावे. सोसायट्यांनी लिफ्ट, लिफ्टची बटणं, सामान्य क्षेत्रं आणि इमारतीतील जिन्यांचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.



हेही वाचा

३१ ते ४० वयोगटातील पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका

सावधान! प्लाझ्मा थेअरपीच्या नावाखाली होत आहे फसवणूक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा