Advertisement

सावधान! प्लाझ्मा थेअरपीच्या नावाखाली होत आहे फसवणूक

कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते

सावधान! प्लाझ्मा थेअरपीच्या नावाखाली होत आहे फसवणूक
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसताना. प्लाझ्मा थेअरपी ही सध्या कोरोना रुग्णांसाठी एक वरदान म्हणून ओळखली जात आहे. मात्र आता अनेक जण प्लाझ्मा थेअरपीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. अशा भामट्यांपासून  सावधान राहण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

हेही वाचाः- Sharad Pawar interview: पुढच्या निवडणुका निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

 कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. २८ दिवसांनतर कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते. ही चाचणी करताना कोविड-१९ वर मात केल्यानंतर रूग्णाच्या शरीरात तयार होणार्‍या अ‍ॅन्टी बॉडीज काढल्या जातात. रक्तदानामधून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि अत्यावस्थ रूग्णाला तो चढवला जातो. दरम्यान यासाठी ICMR ची कडक नियमावली आहे. त्याच्या अखत्यारिमध्ये राहूनच हॉस्पिटलला ही प्लाझ्मा थेरपीची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्लाझ्मा देणगीदाराची कमतरता लक्षात घेऊन काही भामट्यांनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर फसवणूकीचा गोरख धंदा सुरू केला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले  बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.

हेही वाचाः- University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

  प्लाझ्मा दान  करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये  गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात. सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात फसवणूक होऊ शकते.  अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे. सावध असावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधतांना काळजी घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे. जर या संदर्भात काही फसवणूक  होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला कळवा. तसेच www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

 

संबंधित विषय
Advertisement