Advertisement

Sharad Pawar interview: पुढच्या निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

सगळंकाही असंच व्यवस्थित सुरू राहीलं, आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकाही एकत्र लढवू, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

Sharad Pawar interview: पुढच्या निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार
SHARES

सगळंकाही असंच व्यवस्थित सुरू राहीलं, आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकाही एकत्र लढवू, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी  शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग सोमवार १३ जुलै रोजी प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत पवार यांनी भविष्यातील आघाडीबाबत (ncp chief sharad pawar talks about maha vikas aghadi government and upcoming elections) भाष्य केलं.

कुरबुरी सुरूच पण

गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत सत्ता वाटपावरून टोकाचे मतभेद झाले होते. त्यानंतर भाजपला एकटं पाडत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन केलं. या सरकारला सत्तेत येऊन ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. 

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षात अनुभवी नेत्यांची मोठी फळी असल्याने त्यांच्यात सातत्याने चकमकी उडत असतात. महत्त्वाचे निर्णय घेताना आम्हाला विचारात घेतलं जात नाही, अशी तक्रार घेऊन आधी काँग्रेस नेते आणि नंतर राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मध्यंतरी मोठी गाजली होती. त्यासंदर्भात संजय राऊत यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला.

५ वर्षे चालणार

त्यावर उतर देताना शरद पवार म्हणाले, हे सरकार ५ वर्षे चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकासुद्धा एकत्र लढवू, असं म्हणत पवार यांनी भविष्यातील आघाडीचे संकेत दिले.

ठाकरे सरकार पाडण्यात येणार हे सातत्याने ऐकायला येतं. सर्वात आधी हे सरकार ३ महिन्यात पडणार असं सांगितलं जात होतं. आता ६ महिने झाले होऊन गेले आहे. काही जण सप्टेंबरचा वायदा करताहेत. तर काही जण ऑक्टोबरला सरकार पडेल असं सांगत आहेत. पण माझी खात्री आहे की हे सरकार ५ वर्षे उत्तमरित्या राज्य करेल आणि ऑपरेशन कमळ असो किंवा अन्य काही असो त्याचा काहीही परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच सरकारवर टीका करणाऱ्या भाजपलाही शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला दिला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा