३१ ते ४० वयोगटातील पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका

मार्चपासून ते १ जुलै पर्यंत मुंबई पोलिस दलात २८२१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील ४२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. त्यात ५० वर्षावरील पोलिसांच्यामृत्यूचे प्रमाण हे ८२ % इतके आहे.

३१ ते ४० वयोगटातील पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांच्या रक्षणासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी दिवस रात्र झटत आहे. मात्र या संसर्ग रोगाचा सर्वाधिक फटका जर कुठल्या सेवेले पोहचला आहे, विशेषकरून ३१ ते ४० वयोगटातील पोलिसांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचे कारण असे की, मार्चपासून ते १ जुलै पर्यंत मुंबई पोलिस दलात २८२१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील ४२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. त्यात ५० वर्षावरील पोलिसांच्यामृत्यूचे प्रमाण हे ८२ % इतके आहे. तसेच ४२ मृत पोलिसांमध्ये २१ मृत झालेल्या पोलिसांची घरे ही कंटेनमेंट झोनमध्ये येत आहेत.  मुंबई पोलिस दलाने सादर केलेल्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे.

हेही वाचाः- University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सध्या मुंबई पोलिस दलातील ५० वर्षावरील पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिसांना या संसर्गाचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्या अनुषंगाने त्यांना घरीच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाँकडाऊन आणि कंटेनमेंट झोन मध्ये तरुण पोलिसांचावावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांमध्ये वयोगट ३१ ते ४० मधील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.  मार्चपासून ते १ जुलै पर्यंत मुंबई पोलिस दलात २८२१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील ४२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. त्यात ५० वर्षावरील पोलिसांच्यामृत्यूचे प्रमाण हे ८२ % इतके आहे. तसेच ४२ मृत पोलिसांमध्ये २१ मृत झालेल्या पोलिसांचे कार्यालय हे कंटेनमेंट झोन मध्ये आहेत. तर १९ पोलिसांची घरे ही कंटेंनमेंट झोन मध्ये येत असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचाः- Sharad Pawar interview: पुढच्या निवडणुका निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

दरम्यान पोलिस दलातील कोरोनाने मृत पावलेल्या ५० वर्षावरील पोलिसांमध्ये उच्चरक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजाराची लक्षण दिसून आली आहेत. हा आजार असलेल्यांना कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. पश्चिम उपनगर आणि उत्तर मुंबईतील पोलिसांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित पोलिसांची संख्या नोंदवण्यात आलेली आहे. मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यांपैकी एकट्या एल.टी.मार्ग पोलिस ठाण्यात ५७ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात म्हटलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा