मुंबई उच्च न्यायालयात घडली दुर्मिळ घटना

  Fort
  मुंबई उच्च न्यायालयात घडली दुर्मिळ घटना
  मुंबई  -  

  सोमवारचा दिवस हा मुंबई उच्च न्यायालयासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. कारण सोमवारी 14 न्यायमूर्तींचा मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शपथविधी करण्यात आला. चीफ जस्टिस मंजुला चेल्लूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या इतर न्यायमूर्तींसमोर शपथ दिली. या न्यायमूर्तींच्या समावेशानंतर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या 75 वर गेली आहे. सोमवारी शपथ घेणाऱ्या 14 न्यायाधीशांमध्ये विभा कंकनवाडी आणि भारती डांगरे या महिला न्यायाधीशांचाही समावेश आहे. या 14 न्यायमूर्तींमध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या पहिल्या भारतीय पर्मनंट चीफ जस्टिस एम सी चगला यांचे नातू रियाज चगला यांचा देखील समावेश आहे.

  रियाज चगला यांच्यासह सोपान घावणे, सुनील कोटवाल, रोहीत देव, अरुण उपाध्याय, मंगेश पाटील, संदीप शिंदे, अरुण ढवळे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयात 33 न्यायाधीशांची गरज असून, या भर्तीने काही प्रमाणात ही कमी भरून काढण्यास मदत होईल.

  देशभरातील 24 उच्च न्यायालयांमध्ये 1,079 न्यायाधीशांची गरज आहे. मात्र सध्या फक्त 629 न्यायाधीश असून, कमतरता 450 न्यायाधीशांची आहे. देशभरात तब्बल तीन करोड प्रकरणे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी केली जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.