Advertisement

मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार

शिवाय मध्य रेल्वेच्या एकूण 34 स्थानकांवर हे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली होती.

मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार
SHARES

मध्य रेल्वेच्या (central railway) गर्दीच्या मार्गांवर 15 डब्यांची (15 coach) लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यासाठी मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल (mumbai local) फेऱ्या वाढवण्यासाठी फलाटांच्या विस्ताराचं काम सुरू आहे.

आता मध्य रेल्वेच्या एकूण 34 स्थानकांवर हे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली होती.

यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलची प्रवासी क्षमता वाढणार असून, गर्दी नियंत्रणात ठेवणे शक्य होणं आहे. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय रेल्वे सेवांचे जाळे सुधारण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये 33,000 कोटींच्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या मार्गांवर 238 बंद दरवाजांच्या नॉन-एसी लोकलचं बांधकाम सुद्धा सुरू आहे.

या दाखल होताच मध्य रेल्वेवरील प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात अशा दोन लोकल आहेत.

तसेच यांची चाचणी करून एप्रिलपर्यंत सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. ही सेवा सीएसएमटी - कल्याण मार्गावर सुरू होणार असल्याची शक्यता आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांच्या फक्त 2 लोकल आहेत. या लोकलने दररोज तब्बल 22 फेऱ्या चालवल्या जातात.

उर्वरित फेऱ्यांसाठी फक्त 12 डब्यांच्या लोकल ट्रेनचा वापर केला जातो. 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी लांब फलाटांची आवश्यकता असते.

परंतु, सध्या फक्त 10 स्थानकांवर असे फलाट आहेत. सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर सध्या हे लांब फलाट उपलब्ध आहेत.

तसेच सीएसएमटी स्थानकावरही केवळ फलाट क्रमांक 7 ची लांबी 15 डब्यांच्या लोकलसाठी योग्य आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरून ही या लोकल सुरू होणार असल्यामुळे इथेही फलाटांचा विस्तार करणं गरजेचं आहे.

या अंतर्गत मध्य रेल्वेवरील 34 स्थानकांवर फलाटांच्या विस्ताराचं काम हाती घेतलं होतं. परंतु, यापैकी केवळ 5 स्थानकांवरचं हे काम पूर्ण झालं आहे. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत आणि तानशेत रेल्वे स्थानकांवरच हे काम पूर्ण झालं आहे.

कल्याणपुढील अनेक स्थानकांवर हे काम शिल्लक आहे. कल्याण-कसारा मार्गावरील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा रेल्वे स्थानकावरील काम रखडलं आहे.

तसेच, कल्याण-खोपोली मार्गावर वांगणी, शेलू, भिवपुरी, पलासदारी, केळवली, डोळवली, लोवजी आणि खोपोली या रेल्वे स्थानकांवरही काम रखडलं आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवल्या आहेत. जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गांवर या सुरू आहेत.

परंतु, मध्य रेल्वेवर केवळ 22 फेऱ्या असून या सर्व फेऱ्या जलद मार्गावर चालवल्या जातात.

15 डब्यांच्या लोकलची प्रवासी क्षमता 12 डब्यांच्या लोकलपेक्षा 25 टक्के अधिक असते. त्यामुळे ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.



 हेही वाचा

एसटीच्या ताफ्यात 3 हजार नव्या बस

कुत्र्यांचे निर्बीजीकरण करूनही कुत्र्यांचा उपद्रव कायम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा