Advertisement

मुंबईत मंगळवारी १५ टक्के पाणीकपात

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिका हाती घेणार आहे. त्यामुळे अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे

मुंबईत मंगळवारी १५ टक्के पाणीकपात
SHARES

मुंबईत मंगळवारी १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य पाण्याचा साठा करून त्याचा जपून वापर करावा, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

महापालिका मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम ३ ऑगस्टला करणार. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांना १४ तास पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या भागात सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल, अशी माहिती पालिकेनं दिली आहे.

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिका हाती घेणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कामामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम, राम मंदिर, कुर्ला, घाटकोपर आणि गोरेगाव या भागांत पाणी कपात करण्यात येणार आहे. 

याशिवाय मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. यातून एफ उत्तर आणि एफ दक्षिण हा भाग वगळण्यात आला आहे. के पूर्व आणि पी दक्षिण या भागांमध्येही मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम 

अंधेरी पश्चिम-स्वामी विवेकानंद रोड, गुलशन नगर, आर.एम. मार्ग गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा, क्रांतीनगर, विलासनगर, शक्तीनगर, कदमनगर, आनंदनगर, पाटलीपुत्र, चार बंगला, वीरा देसाई रोड, मोरगाव, यादवनगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्टेशन मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली टेकडी या भागात पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. याशिवाय अंधेरी पूर्व-बांद्रेकरवाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर, विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्राrनगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ल्याच्या बहुतांश भागातही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

येथील पाणीपुरवठा खंडित

गोरेगाव – बिंबिसार नगर, राममंदिर, गोरेगाव पश्चिम येथील पाणीपुरवठा खंडित राहील. कुर्ला-विभाग क्रमांक 157 संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, विभाग क्रमांक 158 यादव नगर, वृंदावन वसाहत, अंजली मेडिकल परिसर, विभाग क्रमांक 159, दुर्गामाता मंदिर रोड, लोयलका कंपाऊंड, भानुशाली वाडी, चर्च गल्ली व परिसर, घाटकोपर, आनंद नगर उदंचन केंद्र व वर्षानगर उदंचन केंद्रावरून पुरवठा होणारा परिसर, भटवाडी, बर्वे नगर, भीमनगर, गोळीबार मार्ग, जगदुषा नगर, रामजीव नगर, सिद्धार्थ नगर, गावदेवी, अमृत नगर, आझाद नगर, पारशीवाडी, काजू टेकडी, गंगावाडी, घाटकोपर (पश्चिम) या ठिकाणच्याही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा