Advertisement

भिवंडीत भीषण आगीत १५ गोदामं जळून खाक

या गोदामांमध्ये कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य होतं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

भिवंडीत भीषण आगीत १५ गोदामं जळून खाक
SHARES

भिवंडी (bhiwandi) तील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना (scrap godowns) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग (fire) लागली. या आगीत १५ भंगार गोदामं जळून खाक झाली आहेत. या गोदामांमध्ये कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य होतं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

आगीचे नेमकी कारण समजलं नाही.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या भंगार गोदामांच्या आजूबाजूला रहिवासी घरे आणि यंत्रमाग कारखाने आहे. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. 

दरम्यान, बदलापूर एमआयडीसीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास रासायनिक कंपनीत गॅस गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मोठी घबराट पसरली. बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. या रिअॅक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र यात सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्यानं अचानक रिअॅक्टरमधून गॅस लीक झाला आणि परिसरात पसरला.



हेही वाचा - 

ओशिवरातील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा