Advertisement

कोस्टल रोड की भुलभुलैय्या, आत-बाहेर पडण्यासाठी तब्बल १८ मार्ग

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सी लिंक असा ९.९८ किमीचा कोस्टल रोड महापालिकेकडून बांधण्यात येत आहे. त्यानुसार अमर सन्स उद्यान, हाजीअली आणि वरळी सी फेस या ३ ठिकाणी आंतरबदल अर्थात कोस्टलवर येण्यासाठी आणि कोस्टल रोडवरून बाहेर पडण्यासाठी मुख्य मार्ग असणार आहेत.

कोस्टल रोड की भुलभुलैय्या, आत-बाहेर पडण्यासाठी तब्बल १८ मार्ग
SHARES

मुंबईतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. कोस्टल रोड प्रवासी-वाहनचालकांना फायद्याचा ठरवा यादृष्टीने महापालिका अनेक बारीक गोष्टींवर लक्ष देत आहे. त्याचाच भाग म्हणून कोस्टल रोडवर येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी महापालिकेनं तब्बल १८ मार्ग दिल्याची माहिती मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली आहे.

१८ मार्गांपैकी ९ मार्ग बाहेर पडण्यासाठी, तर ९ मार्ग कोस्टल रोडवर येण्याासाठी आहेत. अमर सन्स उद्यान, हाजीअली आणि वरळी सी फेस या ३ ठिकाणी आंतरबदल अर्थात इंटरचेंज असणार आहेत. या आंतरबदल मार्गाला जोडून हे १८ पर्यायी मार्ग असतील, असंही माचिवाल यांनी सांगितलं.


कुठे असतील पर्यायी मार्ग?

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सी लिंक असा ९.९८ किमीचा कोस्टल रोड महापालिकेकडून बांधण्यात येत आहे. त्यानुसार अमर सन्स उद्यान, हाजीअली आणि वरळी सी फेस या ३ ठिकाणी आंतरबदल अर्थात कोस्टलवर येण्यासाठी आणि कोस्टल रोडवरून बाहेर पडण्यासाठी मुख्य मार्ग असणार आहेत. तर या ३ आंतरबदल मार्गाला जोडून १८ पर्यायी बदल मार्ग बांधण्यात येणार आहेत. जेणेकरून अधिकाधिक परिसरातून प्रवासी-वाहनचालकांना कोस्टल रोडवर येणं सोपं व्हावं.


अमर सन्स आंतरबदल मार्ग

त्यानुसार पहिल्या अमर सन्स आंतरबदल मार्गावर ४ पर्यायी बदल मार्ग असणार असून यांची एकूण लांबी २.५२ किमी असणार आहे. तर त्याची उंची ११.४ किमी असेल. ४ पैकी पहिला मार्ग नेताजी सुभाष मार्गकडून कोस्टल रोडद्वारे येणाऱ्या टाटा गार्डनकडे बाहेर पडण्यासाठी असेल. तर दुसरा पर्यायी मार्ग टाटा गार्डन येथून कोस्टल रोडवर प्रवेश करून सी लिंककडे जाण्यासाठी असेल. तिसरा पर्यायी मार्ग टाटा गार्डनकडून नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्याकरीता, कोस्टलरोडवर प्रवेश करण्याकरता असेल. तर चौथा मार्ग हा सी लिंककडून कोस्टल रोडद्वारे येणाऱ्यांना टाटा गार्डन इथं बाहेर पडण्यासाठी असेल.




हाजीअली आंतरबदल मार्ग

हाजीअली या दुसऱ्या अांतरबदल मार्गावर ८ पर्यायी बदल मार्ग असणार असून त्यांची एकूण लांबी ६.११ किमी इतकी असणार आहे. तर उंची जमिनीपासून २४ मीटर इतकी असेल. यातील पहिला मार्ग नेताजी सुभाष मार्गाकडून कोस्टलरोडद्वारे येणाऱ्यांना रजनी पटेल चौकाकडे बाहेर नेण्यासाठी असेल. दुसरा पर्यायी मार्ग वत्सलाबाई देसाई चौक येथून कोस्टल रोडवर प्रवेश करून सी लिंककडे जाण्यासाठी असेल. तिसरा पर्यायी मार्ग रजनी पटेल चौकातून कोस्टल रोडवर प्रवेश करून नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्यासाठी असेल. तर चौथा मार्ग सी लिंककडून कोस्टल रोडद्वारे येणाऱ्यांना वत्सलाबाई देसाई चौक इथं येण्यासाठी अर्थात बाहेर पडण्यासाठी असेल.

याच मार्गाला जोडून पाचवा मार्ग असेल आणि हा मार्ग सी लिंककडून कोस्टलरोडद्वारे येणाऱ्यांना रजनी पटेल चौकातून बाहेर पडण्यासाठी असेल. सहावा मार्ग नेताजी सुभाष मार्गाकडून येणाऱ्या वाहनांना वत्सलाबाई देसाई चौक येथून बाहेर पडण्यासाठी असेल. तर पुढील सातवा मार्ग वत्सलाबाई देसाई चौक येथून नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्याकरीता, कोस्टलरोडवर प्रवेश करण्याकरता असेल. त्याचवेळी आठवा मार्ग रजनी पटेल चौकातून सी लिंककडे जाण्यासाठी, कोस्टल रोडवर प्रवेश करण्यासाठी असेल.


वरळी सी लिंक आंतरबदल मार्ग

वरळी सी लिंक या तिसऱ्या आंतरबदल मार्गावर ६ पर्यायी बदल मार्ग असणार आहेत. तर याची एकूण लांबी ४.४५ किमी इतकी तर उंची जमिनीपासून ११.३ किमी असणार आहे. यातील पहिला पर्यायी मार्ग नेताजी सुभाष मार्गाकडून कोस्टल रोडवरद्वारे येणाऱ्यांना बिंदूमाधव ठाकरे चौक इथे बाहेर पडण्यासाठी असेल. ज्याद्वारे वरळी नाक्याकडे किंवा वरळी डेअरीकडे जाता येऊ शकेल. तर याच मार्गाला दुसरा पर्यायी मार्ग जोडलेला असेल जो जे. के. कपूर चौक येथे बाहेर पडण्यासाठी असेल. ज्यामुळे वरळी गाव, प्रभादेवी आणि दादरकडे जाता येईल.

तिसरा पर्यायी मार्ग जे. के. कपूर चौकाकडून कोस्टल रोडद्वारे सी लिंकडे वांद्रयाच्या दिशेने जाण्यास उपयोगी ठरेल. तर या मार्गाला जोडून चौथा पर्यायी मार्ग असणार असून तो जे. के. कपूर चौकाकडून कोस्टल रोड द्वारे नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेने जाईल. पुढचा पाचवा पर्यायी मार्ग नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेकडून कोस्टल रोडद्वारे येणाऱ्या वाहनांना जे. के. कपूर चौकाकडे बाहेर पडता यावं यासाठी असेल. तर सहावा पर्यायी मार्ग बिंदूमाधव ठाकरे चौकातून कोस्टल रोडद्वारे नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेने जाण्यासाठी असेल.


४० किमी वेगमर्यादा

असे हे ३ मुख्य आंतरबदल मार्ग आणि त्यावरील १८ पर्यायी बदल मार्ग म्हणजे रस्त्यावरील भुलभुलैय्याच आहे. अशा या आंतरबदल आणि पर्यायी बदल मार्गावर पावसाच्या तसंच भरतीच्या लाटांचं पाणी वाहून जावं यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूने योग्य ती व्यवस्था केली जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर एलईडीचे दिवे लावण्यात येणार आहेत. या १८ पर्यायी मार्गावर वाहनांसाठी ताशी ४० किमी अशी वेगमर्यादा असणआर आहे.



हेही वाचा-

कोस्टल रोड प्रकल्पात ३.४५ किमीचे दोन टनेल

कोस्टल रोडवर नसणार एकही सिग्नल; टोलही नाही



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा