Advertisement

196 नवजात बाळांची कोरोनावर मात

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 14 एप्रिलपासून आतापर्यंत 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली. त्यांनी 196 बाळांना जन्म दिला.

196 नवजात बाळांची कोरोनावर मात
SHARES
सायन रुग्णालयात एक महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवल्याचे उदाहरण ताजे असतानाच नायर रुग्णालयातही 196 नवजात बालकांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे या नवजात बालकांच्या आई कोरोना पॉझिटीव्ह असतानाही बालकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.  

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 14 एप्रिलपासून आतापर्यंत 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली. त्यांनी 196 बाळांना जन्म दिला. या महिलांना कोरोना असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून बाळांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यातील एकाही बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यातील 138 जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

 नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यातरी आवश्यक खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक सर्व प्रकारची आरोग्य सुविधा पुरवण्यात येत असल्याचे नायर रुग्णालयाच्या प्रसूती  विभागाचे डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले.



हेही वाचा -

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा