Advertisement

मुंब्रातील २ विद्यार्थी युक्रेन-रोमानियन सीमेवर अडकून

मुंब्रा येथील एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे दोन विद्यार्थी अन्न, पाणी आणि निवारा शिवाय अडकले आहेत.

मुंब्रातील २ विद्यार्थी युक्रेन-रोमानियन सीमेवर अडकून
SHARES

मुंब्रा येथील एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे दोन विद्यार्थी अन्न, पाणी आणि निवारा शिवाय उणे-१० अंश सेल्सिअस तापमानात रोमानियाच्या सीमेवर अडकले आहेत, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दोघांना २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनमधून रोमानियाच्या सीमेवर बसनं नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना इतर शेकडो विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच थांबवलं गेलं. हिंदुस्तान टाईम्सनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. 

भारतीय दूतावासाकडून पुन्हा मायदेशी सोडलं जाईल याच्याच प्रतिक्षेत त्यांच्यासह अनेक विद्यार्थी तिकडेच अडकून आहेत.

या दोघांनी त्यांच्यापासून केवळ ३०० मीटर अंतरावर पडलेले क्षेपणास्त्र चुकवल्याचा दावा केला. सोहेब अबरार तन्वर आणि नौशाद अब्दुल रशीद या २३ वर्षांच्या दोघा तरूणांना वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे.

रविवारी सकाळी दोघांनी आपल्या कुटुंबीयांना फोन केला पण मोबाईलची बॅटरी संपल्यानं संपर्क तुटला.

कुटुंबानं दावा केला की कुटुंबातील बहुतेक तरुण डॉक्टर आहेत आणि अशा प्रकारे दोन चुलत भावांना देखील वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते आणि त्यांनी युरोपमध्ये शिक्षण घेण्याच्या महत्त्वाकांक्षेनं टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.

दोन्ही विद्यार्थ्यांचे काका, ५८ वर्षीय निजाम्ममुद्दीन हुसेन खान म्हणाले, “त्यांनी ऐकले होते की युक्रेनमध्ये परवडणाऱ्या दरात वैद्यकीय घेता येते. त्यामुळे त्यांनी तिथं अर्ज केला होता. २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता त्यांना भारतीय दूतावासातून कॉलेज सोडून रोमानियन सीमेवर जाण्याचा फोन आला. तेथे आणखी बरेच भारतीय विद्यार्थी होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी २० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.”

बस चालक स्थानिक होते आणि सीमेवर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारले. “विद्यार्थ्यांनी सीमेवर जाताना केवळ ३०० मीटर अंतरावर क्षेपणास्त्र मारल्याचे पाहिले.

रोमानियाला पोहोचण्यासाठी त्यांना ३ रात्र लागली आणि सुरक्षा दलांसोबत ते जिथे होते तिथे आणखी आठ तास लागले.

दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आश्वासन दिलं की सीमा सोडण्यासाठी बराच वेळ थांबावं लागलं तरी ते सुरक्षितपणे घरी पोहोचतील.

नौशादचा भाऊ सल्लाउद्दीन खान म्हणाला, “माझ्या भावांनी आम्हाला सांगितलं की तापमान उणे १० अंश सेल्सिअस होते आणि ते सर्वजण रस्त्याच्या कडेला बाहेर पडण्याची वाट पाहत होते. त्यांच्याकडे पुरेसे अन्न नव्हते आणि ते दर दोन तासांनी पाणी घेतात आणि बरेच दिवस त्यांना झोप लागत नव्हती. तणावामुळे त्यांना झोप येत नव्हती, तर त्यांची बॅटरीही संपली होती. आम्ही सर्वजण त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि त्यांना लवकरच परत भेटण्याची आशा आहे.”

अडकलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी बचावासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले, "आम्हाला या दोन विद्यार्थ्यांची नावं मिळालेली नाहीत आणि जर कुटुंबानं त्वरित आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही आवश्यक ती पावले उचलण्यासाठी त्यांची माहिती राज्य सरकारला पाठवू."



हेही वाचा

रशिया-युक्रेन युद्ध: १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा