Advertisement

रशिया-युक्रेन युद्ध: १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल

रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्याप्रमाणात युद्ध सुरू आहे. याच्यातील युद्धामुळं अनेक भारतीय हे युक्रेनमध्ये अडकले आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध: १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल
CSMIA provided smooth transit by creating a dedicated corridor for seamless movement along with food & beverage and onward journey arrangements.
SHARES

रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्याप्रमाणात युद्ध सुरू आहे. याच्यातील युद्धामुळं अनेक भारतीय हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. मात्र त्यांना सुखरूप पुन्हा मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मंगळवारी मुंबईत पोहचलं. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत हे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत दाखल झालं.

मंगळवारी सकाळी १८२ भारतीयांचे सातवे विमान युक्रेनमधून भारतात दाखल झाले. मायदेशात आल्यानंतर या नागरिकांशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संवाद साधत त्यांच्यावर असलेले दडपण दूर केले आहे. तसेच सर्वांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एयर इंडियाचे विमान आयएक्स१२०२ ने मुंबईत पोहोचलेल्या १८२ भारतीयांचे स्वागत केले आहे. हे एयर इंडियाचे विशेष विमान आहे. यापूर्वी बुडापेस्टवरुन २४० भारतीय प्रवाशांना घेऊन सहावे विमान भारतात दाखल झाले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली होती. विमानतळावर प्रवाशांच्या सुविधेसाठी मदतकक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत भारतीयांना Ukraine मधून मायदेशी आणण्यात येत आहे. आज १८२ विद्यार्थी दाखल झाले. सरकारच्या वतीने मी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारांनी व्यवस्था केली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थी थोडे दडपणाखाली जाणवत होते, त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधानांनी 4 मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून पाठवले असल्याचे नारायण राणे म्हणाले. भारतीय दुतावासाच्या संपर्काने आम्ही सीमेवर पोहोचलो, तेथून आम्हाला विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. मायदेशी परतल्याचा आनंद असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

''२१६ अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन आठवे विमान हंगेरीची राजधानी बुखारेस्ट येथून नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहे, तर २१८ भारतीयांना घेऊन नववे फ्लाइट रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 'ऑपरेशन गंगा'चा भाग म्हणून नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहे'', परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा