Advertisement

राणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये

राणी बागेच्या विकासासाठी महापालिकेनं २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशांचा वापर राणी बागेत आधुनिक सुविधा सुरू करण्यासाठी केला जाणार आहे.

राणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये
SHARES

भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणी बागेच काही दिवसांपूर्वी मंगळूर प्राणीसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्याची जोडी दाखल झाली. अशातच राणी बागेत आणखी काही परदेशी पाहुणे दाखल होणार आहेत. या प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. त्यातच राणी बागेच्या विकासासाठी महापालिकेनं २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशांचा वापर राणी बागेत आधुनिक सुविधा सुरू करण्यासाठी केला जाणार आहे.


२०० कोटी रुपये

महापालिकेकडून मिळणार २०० कोटी रुपयांतून राणी बागेतील विकास कामांसह आधुनिक सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. तसंच, काही परदेशी प्राणी देखील राणी बागेत आणले जाणार आहेत. याकरीता केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडं परवानगी मागण्यात आली आहे. जग्वार, चित्ता, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी, लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी आणले जाणार असून लवकरच 'थ्री'डी थिएटर सुरू करण्यात येणार आहे


सिंहाची व कोल्ह्यांची जोडी

मे महिन्याच्या अखेरीस सुरत प्राणिसंग्रहालयातून सिंहाची व कोल्ह्यांची जोडी आणि देशी अस्वल मादी दाखल होणार आहे. याशिवाय नर अस्वल जून महिन्यात येणार आहे. सध्या सिंहाच्या पिंजऱ्याचं काम सुरू असून, त्याला गुजरातमधील गीर अभयारण्य परिसरातील गावातल्या झोपड्यांचं स्वरूप देण्यात आलं आहे. पर्यटकांना सिंह पाहण्यासाठी व्ही विंग शेल्टर तयार करण्यात आलं आहे. सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये बांबूची झाडं, गवत, दगड, बसण्यासाठी आसनं, धबधबा इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे.हेही वाचा -

रेल्वेच्या एका तिकीटीवर करता येणार तिन्ही मार्गावर प्रवासRead this story in हिंदी or English
संबंधित विषय