Advertisement

रेल्वेच्या एका तिकीटीवर करता येणार तिन्ही मार्गावर प्रवास

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं खुशखबर दिली आहे. कारण आता पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर एकाच तिकीटानं प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

रेल्वेच्या एका तिकीटीवर करता येणार तिन्ही मार्गावर प्रवास
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं खुशखबर दिली आहे. कारण आता पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर एकाच तिकीटानं प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसंच, या एका तिकीटावर प्रवशांना संपुर्ण दिवस तिन्ही मार्गावर अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. त्यामुळं येत्या काळात लोकांचा रेल्वे प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे.


तिकीटीची किंमत

प्रवाशांना रेल्वेचं तिकीट एक दिवसासह ३ आणि ५ दिवसांसाठी देखील काढता येणार आहे. संपुर्ण एक दिवसासाठी लोकलमधील सेकंड क्लास डब्याची तिकीट ७५ रुपये असेल, तर ३ दिवसांसाठी रेल्वे तिकीट ११५ रुपये असेल तसंच, ५ दिवसांसाठी रेल्वेचं तिकीट १३५ रुपये असणार आहे. त्याचप्रमाणं फस्ट क्लास डब्याची एक दिवसासाठी तिकीट २५५ रुपये असेल, तर ३ दिवसांसाठी रेल्वे तिकीट ४१५ रुपये असेल तसंच, ५ दिवसांसाठी रेल्वेचं तिकीट ४८५ रुपये असणार आहे


अनलिमिटेड प्रवास

प्रवाशांनी या तीन तिकीटांमधील कोणतेही तिकीट खरेदी केल्यास त्यांना त्या तिकीटाची वैधता संपेपर्यंत अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय मध्यरात्रीपर्यंत या तिकीटीची वैधता असणार आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा