एकाच मार्गावरील ५० खड्डे बुजविण्यास सुरुवात

 wadala
एकाच मार्गावरील ५० खड्डे बुजविण्यास सुरुवात
एकाच मार्गावरील ५० खड्डे बुजविण्यास सुरुवात
See all

वडाळा - बरकत अली नाका ते जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग या एकाच मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले ३५ खड्डे बुजवण्याच्या कामाला शनिवारपासून वेग आलाय. वडाळ्यातील बरकत अली दर्गा मार्ग ते शिवाजी चौक विद्यालंकार महाविद्यालय रोड, दोस्ती कॉम्प्लेक्स, वाल्मिकी चौक आणि जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग या मुख्य रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यांपासून ठिकठिकाणी लहान - मोठे असे तब्बल ६० खड्डे पडले होते. या खड्यांमुळे अपघाताला आमंत्रण आणि रोजची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक आणि पादचारी संताप व्यक्त करत होते. याची दखल घेऊन येथील खड्डे बुजविण्यात यावेत, यासाठी पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडे मनसे वडाळा विधानसभा प्रभाग क्र. १७२ चे शाखा अध्यक्ष संजय बन्सी रणदिवे सातत्याने पाठपुरावा करत होते.मात्र, पत्रव्यवहार करून काही साध्य होत नसल्यानं रणदिवे यांनी वडाळा पूर्व बरकत अली नाका ते जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग या एकाच मुख्य रस्त्यावर पडलेल्या ५० खड्यांचे फोटो काढले. त्याची एक सीडी तयार केली. आणि एफ - उत्तर विभाग कार्यकारी अभियंता नामदेव तळपे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर लगेचच पालिकेनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं.

Loading Comments