मुंबईतील (mumbai) जवळपास 25 डब्बावाल्यांना शहरात जेवणाचे डबे वितरीत करण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रिकल मोटारसायकली मिळाल्या आहेत.
इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड (IIFL) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) सोबत शहरातील वातावरण फाऊंडेशनने एकत्रितपणे मोटारसायकलींचे वाटप केले.
या कार्यक्रमात बोलताना पालिकेचे उपमहापालिका आयुक्त (पर्यावरण आणि हवामान बदल) मिनेश पिंपळे म्हणाले की, हा उपक्रम खरोखरच इतर लास्ट माईल डिलिव्हरी कंपन्यांना नॉन-मोटाराइज्ड मोबिलिटीकडे वळण्यास प्रोत्साहित करणार आहे.
एकूण डब्बावाल्यांपैकी 63 टक्के डब्बेवाले (dabbawala) टिफीन देण्यासाठी सायकलने दररोज 12 किमी पेक्षा जास्त प्रवास करतात.
वातावरण फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे की, शहरातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अभ्यासात असेही आढळून आले आहे की 78 टक्के डब्बेवाले सायकल चालवण्याला प्राधान्य देतात, तर 53 टक्के डब्बेवाले वाहतुकीतून सहज चालण्याला महत्त्व देतात.
तथापि, 46 टक्के डब्बावाल्यांनी वाहतूक ही एक मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी 26 टक्के डब्बेवाल्यांनी त्यांच्या सायकलसाठी सुरक्षित पार्किंग जागा नसल्यामुळे संघर्ष करत असल्याचे म्हटले आहे. तब्बल 89 टक्के डब्बावाल्यांनी शहरात स्वतंत्र सायकल लेन असावी अशी गरज व्यक्त केली होती.
मुंबईचे डब्बेवाले गेल्या शतकाहून अधिक काळापासून शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. डब्बेवाले दररोज 20,000 - 30,000 जेवणाचे डबे पोहोचवतात. ज्यामुळे काळ बदलला तरी डब्बावाल्यांची वाहतुकीची पद्धत तशीच राहिली आहे.
डब्बेवाले त्यांच्या डिलिव्हरीसाठी सायकलींचा वापर करतात हे लक्षात घेऊन, त्यांच्यामध्ये ई-मोटर सायकलींचे (E-motorcycle) वाटप करण्यात आले. त्यामुळे त्यांची वाहतुक सोईची आणि सक्षम होणार आहे.
हेही वाचा