चेंबूरमध्ये झाड पडून तिघं जखमी, जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

जखमींमध्ये दोन अल्पवयीमुलांचा समावेश असून त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाँक्टरांनी दिली.

SHARE
चेंबूरमध्ये झाड उमळून पडल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. जखमीॆमध्ये दोन अल्पवयीमुलांचा समावेश असून त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाँक्टरांनी दिली.


मुंबईत झाडपडून अनेकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. माञ या घटनांघडून सुद्धा पालिकेकडून निर्जीव झाडांबाबत कोणतिही  ठोस निर्णय घेतले जात नाहीत. गुरूवारी दुपारी देखील चेंबूरच्या पेस्टोम सागर रोड नं 6 वरील सोमय्या काँलेज सिग्नलजवळील एक झाड दुपारी 12 च्या सुमारास अचानक उन्मळून पडले. त्यावेळी झाडाखाली विकास पडितालात (10) महेश पातरकय (7),शिवाजी लोंढे (50) हे या झाडाखाली अडकले.


वेळीच स्थानिक तिघांच्या मदतीसाठी पुढे सर्सावले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने तिघांना तातडीने जवळील शासकिय रुग्णालयात नेले. तिघांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात  उपचार सुरु असून तिघांची प्रकृती स्थिर आहे. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या