Advertisement

मुंबईत पुन्हा आग; अंधेरीत लागलेल्या आगीत ३ जण होरपळल्याची माहिती

मुंबईतील २० मजली इमारतीला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली.

मुंबईत पुन्हा आग; अंधेरीत लागलेल्या आगीत ३ जण होरपळल्याची माहिती
(Representational Image)
SHARES

मुंबईतील २० मजली इमारतीला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ३ जण होरपळल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पुर्वेकडील काजूपाडा परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली.

या आगीच्या दुर्घटनेनंतर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील काजूपाडा परिसरातील एका सोसायटीतील घरात आग लागली. घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागली. या आगीत ३ जण होरपळले आहेत.

बुधवारी रात्री ८.०८ वाजता लागलेली आग साधारण पावणे नऊ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत.

या तिघांनाही सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गॅस गळतीमुळं घरात आग लागली. या आगीत हकिम मुल्ला खान (५०), सोहेल खान (२४) आणि सलीम अन्सारी (३८) हे जखमी झाले आहेत. या तिघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या आगीत दोघे जण १० ते १५ टक्के भाजले असल्याची माहिती देण्यात आली. तर सलीम अन्सारी हा तरूण ८५ टक्के भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी राजावाडीतून सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा