Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी
SHARES

मुसळधार पावसामुळे (Heavy rain in Mumbai) मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झालेत.

न्यू कलेक्टर (New Collector compound) कंपाऊंटमधील ३ मजली इमारतीचा दुसराआणि  तिसरा मजला लगतच्या १ मजली चाळीवर कोसळला. यात ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये ६ लहांना मुलांचा समावेश आहे. या लहानग्यांचं वय १० वर्षाच्या आत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास १६ जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. ज्यात ३ लहान मुलं, ३ महिला आणि १० पुरुषांचा समावेश होता. दुर्घटनेतून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या इमारतीत एकूण २ ते ३ कुटुंब राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. इथल्या रहिवाशांना तातडीनं अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा