बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी रात्री मालाडमध्ये (malad) एका 39 वर्षीय इसमाचा विजेचा धक्का (electric shock) लागून 25 फूट खोल नाल्यात (drain) पडून मृत्यू (death) झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमलेश चंद्रकांत शिताब असे मृताचे नाव आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालाड पूर्वेतील त्रिवेणी नगर रस्त्यालगत असलेल्या पारेख नगर गार्डनजवळ रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अहवालानुसार, नाल्यातून बाहेर काढल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ घोषित केले.
दरम्यान, बुधवारी रात्री 13 नोव्हेंबरला आणखीन एका घटनेत (accident), चेंबूरच्या म्हाडा कॉलनीत आग लागल्याने नाफिर सय्यद नावाचा 60 वर्षीय व्यक्ती भाजला. कॉलनीतील इमारत क्रमांक 6 मध्ये रात्री 10.47 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली.
सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेल्या आगीत सय्यदचा हात, चेहरा आणि मानेवर 30 टक्के भाजले आहेत.
हेही वाचा