Advertisement

जोगेश्वरी भूखंड प्रकरण: सर्वंकष चौकशीसाठी नेमल्या समित्या

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी नेमण्यात आलेल्या उपायुक्त निधी चौधरी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर तो अहवाल आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला. या अहवालात विकास नियोजन विभागाचे १२ आणि विधी विभागाच्या ४ अधिकाऱ्यांवर दोष ठेवण्यात आला आहे.

जोगेश्वरी भूखंड प्रकरण: सर्वंकष चौकशीसाठी नेमल्या समित्या
SHARES

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी १८ जणांना दोषी ठरवून ४ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आय .ए. कुंदन व  उपायुक्त प्रकाश कदम आणि विधी विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी  उपायुक्त नरेंद्र बर्डे आणि उपायुक्त सुधीर नाईक यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

अहवाल सादर

भूखंड प्रकरणी नेमण्यात आलेल्या उपायुक्त निधी चौधरी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर तो अहवाल आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला. या अहवालात विकास नियोजन विभागाचे १२ आणि विधी विभागाच्या ४ अधिकाऱ्यांवर दोष ठेवण्यात आला आहे.


सर्वंकष चौकशीसाठी...

विकास नियोजन विभागाच्या ८ अधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी करण्यासाठी अतिरीक्त आयुक्त आय. कुंदन यांची समिती नेण्यात आली आहे. तर उर्वरीत ४ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यासाठी उपायुक्त प्रकाश कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विधी विभागाच्या ६ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यातील ४ अधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी करण्याची जबाबदारी नरेंद बर्डे यांच्यावर सोपवली आहे, तर उर्वरीत २ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी उपायुक्त सुधीर नाईक करणार आहेत.


हेही वाचा -

जोगेश्वरी भूखंड प्रकरण: 4 निलंबित, 18 जणांवर ठपका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा