Advertisement

'या' ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार- पालिका


'या' ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार- पालिका
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत. पाणी तुंबू नये यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र तरीही पाणी तुंबत. हे चित्र बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यापैकी २२३ ठिकाणी काम पूर्ण झालं आहे. तर २४ ठिकाणी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं नियोजन आहे. तरीही ४० ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यातही पूरमुक्त होणार नाही, असे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे.

मुंबईत अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खोलगट असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात भरती आल्यास पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळं महापालिकेने ब्रिमस्टोवेडअंतर्गत मुंबईत ८ ठिकाणी पंप बसविणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवल्यामुळे पाणी साचणारी ठिकाणे कमी होत आहेत.

या प्रयत्नांमुळे मुंबईतील २२३ ठिकाणे पूरमुक्त झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. सन २०१७ मध्ये मुंबईत २२५ ठिकाणी पाणी साचले होते. २०१८ मध्ये ४८ आणि २०१९ मध्ये ६३ ठिकाणांची त्यात भर पडल्याने पाणी साचणारी ठिकाणे ३३६ झाली होती. मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे २२३ ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत.

आणखी २४ ठिकाणी सुरू असलेली काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे. तसेच १४ ठिकाणी पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. तर २८ ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पालिका नियोजन करीत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा