Advertisement

मुंबईत कोरोनाचे ४०८ नवे रुग्ण; ६ रुग्णांचा मृत्यू

रविवारी मुंबईत ४१ हजार ११० चाचण्या झाल्या आणि ४०८ रुग्ण आढळले.

मुंबईत कोरोनाचे ४०८ नवे रुग्ण; ६ रुग्णांचा मृत्यू
SHARES

मुंबईत रविवारी कोरोनाच्या ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मागील रविवारी मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर मात्र दिवसाला ४ ते ६ मृत्यू होत आहेत. रविवारीही ६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५३१ रुग्ण बरे झाले आहेत.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णवाढीचा दर ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर गेला होता. मात्र आता काही दिवसांपासून हा दर कमी होऊन ५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी मुंबईत ४१ हजार ११० चाचण्या झाल्या आणि ४०८ रुग्ण आढळले. 

राज्यात दिवसभरात १,४१० रुग्णांची नोंद झाली, तर १८  जणांचा मृत्यू  झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख जणांना संसर्ग झाला आहे. दिवसभरात १५२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ८९४ इतकी आहे. गेल्या २४ तासांत अहमदनगर १३२, पुणे जिल्हा १७०, पुणे शहर ८१, पिंपरी-चिंचवड ३७, सोलापूर ३३, सातारा ५३ अशी रुग्णनोंद झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा