Advertisement

ठाण्यात ४५२२ धोकादायक इमारती

अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती रिकाम्या केल्यानंतर त्या पाडण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.

ठाण्यात ४५२२ धोकादायक इमारती
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी पालिकेने तयार केली आहे. यानुसार, ठाण्यात ४५२२ धोकादायक इमारती आहेत. यामधील  ७३ इमारती अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारतींची संख्या यंदा कमी झाली  आहे. गेल्या वर्षी या इमारतींची संख्या १०३ होती. 

अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती रिकाम्या केल्यानंतर त्या पाडण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते.  त्यामध्ये धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए , सी २ बी आणि सी ३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते. 

नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४३ धोकादायक इमारती आहेत. घोडबंदरमध्ये केवळ एक इमारत धोकादायक आहे. तर वर्तकनगर भागात एकही इमारत धोकादायक नाही. लोकमान्य-सावरकरमध्ये ७, उथळसरमध्ये ६, कळव्यामध्ये ५, मुंब्य्रामध्ये ६ आणि दिव्यामध्ये ५ इमारती अतिधोकादायक आहेत.



हेही वाचा - 

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा