Advertisement

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेहिकल असे मॉडेल नाम असणाऱ्या सदर पाचही कार या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहनं आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांसह सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक वाहनांचाही समावेश आहे. याच ताफ्यामध्ये आजपासून ५ इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

‘ही वाहनं ‘ड्राय-लीज’ पद्धतीनं सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांसाठी दरमहा २७ हजार रुपये  इतका खर्च आहे. यामध्ये परिरक्षण आणि दुरुस्तीचा देखील समावेश आहे. या वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहनं साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.

“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनं (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील पर्यावरण पूरक बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

याच कार्यक्रमादरम्यान ‘व्हिजन – 2030’ अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ देखील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देखील नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि आपली मते आवर्जून मांडावीत, असंही आवाहन त्यांनी केलं आहे

या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी “https://mcgm-citizen-survey.cloudstrats.com” या संकेतस्थळावरील प्रश्नांची उत्तरे देऊन सदर सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



हेही वाचा

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करा- उद्धव ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा