Advertisement

BKC मधील महत्त्वाच्या ठिकाणी 50 प्लास्टिक बेंच बसवले

नागरिकांनी दान करून जमा झालेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून हे प्लास्टिक बेंच बनवण्यात आले आहेत.

BKC मधील महत्त्वाच्या ठिकाणी 50 प्लास्टिक बेंच बसवले
SHARES

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील महत्त्वाच्या ठिकाणी 50 प्लास्टिक बेंच स्थापित करण्यात आले आहेत. एमएमआरडीए (mmrda) आणि बीकेसी (bkc) मधील यूएसएच्या महावाणिज्य दूतावासाच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. 

नागरिकांनी दान करून जमा झालेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून हे प्लास्टिक (plastic) बेंच बनवण्यात आले आहेत. या बेंचची रचना आरामदायी आहे. हा उपक्रम केवळ प्लॅस्टिक कचऱ्याच्या पुनर्वापराला (recycled) प्रोत्साहन देतो. 

तसेच यामुळे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करते. या बेंचमध्ये विविध डिझाईन्स काढले आहेत. पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करून, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी प्रयत्न करण्याचे यामागचा मूळ उद्देश आहे.

या कार्यक्रमाला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुंबईतील (mumbai) यूएस कॉन्सुल जनरल माईक हॅन्की, प्रोजेक्ट मुंबईचे सीईओ आणि संस्थापक शिशिर जोशी तसेच आशियाईचे सह-प्रवर्तक श्री जलज दाणी यांच्या मान्यवर उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला. 

डॉ. राजेश गावंडे (क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, विदेश भवन बीकेसी), जयेश शहा (नमन ग्रुपचे अध्यक्ष), अनुप मेहता (भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष), देवेंद्र भरमा (सीईओ, जिओ वर्ल्ड सेंटर), आशिष चौहान (चेअरमन) यांच्यासह श्री रिधम देसाई (सीएमडी, मॉर्गन स्टॅनले इंडिया), आणि कमल खेतान (चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, सनटेक रियल्टी लि.) हे देखील या बेंच स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.



हेही वाचा

Metro Connect 3 ॲपचे अनावरण, मात्र प्रवासी नाखूश

चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा