Advertisement

गिरगावकरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

'आम्ही गिरगावकर' या सामाजिक संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदतीसाठी ५१ हजार रुपये मदत देण्यात आली आहे.

गिरगावकरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी घराबाहेर न पडणं पसंत केलं आहे. दरम्यान, कोरोनामुळं मुंबईची झालेली स्थिती लक्षात घेता तसंच, करोनाविरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 'आम्ही गिरगावकर' या सामाजिक संस्थेकडून मदत करण्यात आली आहे.

'आम्ही गिरगावकर' या सामाजिक संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदतीसाठी ५१ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील प्रत्येक सामाजिक संस्थेनं किमान १० हजार रुपये मदत मुख्यमंत्री निधीला देऊन सरकारचे हात आणखी बळकट करूया, असं आवाहन 'आम्ही गिरगावकर' संस्थेनं केलं आहे.

करोना आजारांचा सामना करण्यासाठी महापालिकेला आर्थिक बळ देण्यासाठी मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांनी एकत्र येऊन दोन कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. हा धनादेश मंगळवारी महापालिकेचे सह आयुक्त आशुतोष सलील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा