Advertisement

रेल्वेनं विनातिकीट लोकल प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास बंद ठेवण्यात आला आहे.

रेल्वेनं विनातिकीट लोकल प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी अनेक प्रवासी हे आर्थिक खर्च सावरण्यासाठी लोकलनं प्रवास करत आहे. मात्र, लोकलचा अधिकृत पास नसल्यानं त्यांना कारवाईचा सामाना करावा लागतो आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर जुलै महिन्यात ५४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ४ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

विशेष म्हणजे गेल्या ४ महिन्यात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची चार हजार ९४ बनावट ओळखपत्रेही जप्त केली आहेत. १ जुलै ते २८ जुलै २०२१ मध्ये ५४ हजार १२० विनातिकीट उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून एक कोटी ८० लाख रुपयांचा दंड वसूल केला.

एप्रिल २०२१ मध्ये २८ हजार ९१० विना तिकीट प्रवाशांवर कारवाई झाली होती. त्यानंतर मे  मध्ये हीच संख्या ३२ हजार ९०७ आणि जूनमध्ये ४० हजार ५२५ एवढी झाली. एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत ४ हजार ९४ बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा