Advertisement

बेस्टच्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बेस्टच्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या बेस्टच्या चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

बेस्टच्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. या वाढत्या रुग्णांमुळं महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या बेस्टच्या चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

एकाचवेळी तब्बल ६० जणांना कोरोनाची लागण झाल्यानं भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय आता या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्यांचाही शोध घेतला जात आहे. 

मुंबईत मंगळवारी तब्बल १० हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. ४७ हजार ४७६ सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

मंगळवारी (४ जानेवारी) रोजी पालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत नव्या १०, ८६० रुग्णांची भर पडली आहे. तर ६५४ रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ७,५२,०१२ इतके रुग्ण बरे झाले असून मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९२% इतका नोंदवण्यात आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा