Advertisement

टाॅयलेटमध्ये आढळला ७ फूट लांब अजगर

भांडुपमधील पालिकेच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील शौचकुपात ७ फूट लांब अजगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

टाॅयलेटमध्ये आढळला ७ फूट लांब अजगर
SHARES

भांडुपमधील महापालिकेच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील शौचकुपात ७ फूट लांब अजगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विनय ढोबळे असं त्यांचं नाव असून त्यांच्या घरातील शौचकुंपातच अजगर आढळला. दरम्यान, शौचकुंपात अचानक अजगर पाहिल्यानं विनय यांच्या पत्नी चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर, सर्प मित्रांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन अजगराला पकडलं.


म्युनिसिपल सोसायटीचा परिसर

भांडुपच्या म्युनिसिपल सोसायटीमधील तळमजल्यावर विनय ढोबळे यांच घर आहे. म्युनिसिपल सोसायटी परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नजीकच आहे. त्यामुळं विनय हे लघुशंकेला गेले असता त्यांना शौचकुपात त्यांना अजगर दिसला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत शौचकुपात अजगर असल्याचं कुटुंबीयांना आणि सोसायटीतील रहिवाशांना सांगितलं. 

या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं याबाबत सर्प मित्रांना माहिती दिली. त्यानंतर, सर्प मित्रांनी हा अजगर पकडला. त्याशिवाय काही दिवसांपुर्वी विनय ढोबळे ज्या परिसरात राहतात त्या परिसरात अजगर आढळला होता.हेही वाचा -

लोकलच्या महिला डब्यावर दगडफेक, एक प्रवासी जखमी

केवळ अभियंत्यांना जबाबदार धरू नये; महापालिकेच्या इंजिनिअर्स युनियनचं आयुक्तांना पत्रRead this story in हिंदी
संबंधित विषय