Advertisement

केवळ अभियंत्यांना जबाबदार धरू नये; महापालिकेच्या इंजिनिअर्स युनियनचं आयुक्तांना पत्र

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नजीक असलेला हिमालय पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले होते.

केवळ अभियंत्यांना जबाबदार धरू नये; महापालिकेच्या इंजिनिअर्स युनियनचं आयुक्तांना पत्र
SHARES

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नजीक असलेला हिमालय पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेच्या काही अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियननं महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून या प्रकरणी केवळ अभियंत्यांना जबाबदार धरू नये, अशी मागणी केली आहे.


अभियंते जनसेवक

पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी माहिती घेतली होती, तसंच त्यांनी जखमींचीही भेट घेत विचारपूस केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित याची जबाबदारी ठरवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनीही कारवाई करत २ अभियंत्यांना अटक केली होती. आता महापालिकेच्या युनियननं अभियंत्यांची पाठराखण करत महापालिकेचे अभियंते हे जनसेवक असल्याचं सांगत ते त्यांच्या कर्तव्यांचं पालन करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या अभियंत्यांनर अधिक भार असल्याचंही युनियननं म्हटलं आहे.

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तपासानंतर अटक करण्यात आलेल्या ऑडिटर नीरज देसाईविरोधात ३०४(ए) आणि ३०४(२) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




हेही वाचा -

दीड लाखांसाठी महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, गँगस्टर रोडिओवालाची कबुली

मुंबईत डाॅन बनण्याचं स्वप्न पडलं महागात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा